Mass singing of national Anthem : उद्या राज्यभर सामुहिक राष्ट्रगीत गायन, स्वराज महोत्सवाचं आयोजन

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने; "सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात" सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली असून, राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola