Punha Nivadnuk | मराठी कलाकारांच्या #पुन्हानिवडणूक ट्वीटवरुन वाद, काँग्रेसचा आक्षेप; हा हॅशटॅग आहे तरी काय? | ABP Majha

Continues below advertisement
निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करु न शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेची चर्चा सुरु केली. एकीकडे महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे आपलंच सरकार येईल, असा दावा भाजपने केला आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये मराठी चित्रपट कलाकारांच्या एकसारख्या ट्वीटवरुन वाद रंगला आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले आहेत. दरम्यान, मराठी कलाकारांनी एकाच वेळी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरण्यामागची दुसरी बाजू समोर आली आहे. हा एक प्रमोशनाचा भाग आहे. धुरळा नावाचा सिनेमा येत आहे. त्याचाच भाग म्हणून हा हॅशटॅग करण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram