Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा आरक्षणच्या बैठकीला भाजप नेते गैरहजर : चव्हाण

Continues below advertisement

काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा आरक्षणासमदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र भाजपचे नेते इतक्या महत्वपूर्ण अनुपस्थित होते हे अनुचित आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाचा कायद्यातील बदल अपेक्षित आहे त्यासंदर्भातला एक प्रस्ताव लोकसभेत मांडलेला आहे,आज कदाचित हाऊसमध्ये येईल मात्र नुसता राज्यांना अधिकार देऊन उपयोग नाही जोपर्यंत ५०% ची मर्यादा शिथील होत नाही तोपर्यंत आरक्षण लागु करणं अशक्य आहे. या विषयावर चर्चा करण्याकरता , भूमीका मांडण्यासाठी काल बैठक बोलावली होती दुर्देवानं या विषयावर मतदानही होणार आहे,मात्र, इतक्या महत्वपूर्ण विषयावर भाजपचे नेते अनुपस्थित राहतात असे चव्हाण यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram