Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा Ajit Pawar यांना विरोध : ABP Majha
अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. शनिवारी 28 ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे. मोळी पूजनाला अजित पवारांना बोलावू नका येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे. जर अजित कार्यक्रम स्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जाऊ दिले जाणार नाही.. जर अजित पवार आले तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.