Manoj Jarange Full Speech : देवेंद्र फडणवीस...महागात पडेल! आझाद मैदानावरील स्फोटक भाषण Azad Maidan
Manoj Jarange Full Speech : देवेंद्र फडणवीस...महागात पडेल! आझाद मैदानावरील स्फोटक भाषण Azad Maidan
Mumbai Police Notice to Manoj Jarange Patil मुंबई: गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज (2 सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी स्वत: ही नोटीस घेऊन आझाद मैदानात आले. ही नोटीस प्रथम मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व्यासपीठावर गेले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून जागे करत ही नोटीस त्यांच्या हातात ठेवली. त्यामुळे आता मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.