Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघेपर्यंत मनोज जरांगे उपोषणावर ठाम : ABP Majha

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आता आक्रमक झालेत. जोपर्यंत सरकारचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी केलाय. दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांची अंतरवाली सराटी गावातील आंदोलनस्थळी भेट घेतली होती. त्यावेळी जरांगे यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर काल मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार घेतली. पण अध्यादेशावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे जरांगे उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांना राज्यातून मिळणारा पाठिंबा आणि रोज भेटणारे वेगवेगळ्या पक्षाचे नेते सरकारकडून हालचालींना वेग आलाय. आणि आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram