Manikrao Kokate Resignation | कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता, Ajit Pawar-Devendra Fadnavis नाराज
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. सभागृहातील त्यांच्या वर्तनामुळे आणि 'सरकारला भिकारी म्हणाले' या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड नाराज आहेत. शुक्रवारी पुण्यात अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यात दोन तास चर्चा झाली. सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा अजित पवार यांना कळवली. सरकारला सातत्याने अडचणी निर्माण होत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नसल्याची या बैठकीत चर्चा झाली. अजित पवार आज संध्याकाळपर्यंत पक्षातील नेत्यांजवळ कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबद्दल आणि वक्तव्याबद्दल अजित पवारांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर येत नव्हती, परंतु आता मंगळवारपर्यंत त्यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्टता येईल अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत चर्चा केली आहे आणि त्यानंतर या संदर्भातले काही अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.