Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे जिंकले, काँग्रेस जिंकणार? : Abhijit Karande Center Point 11

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे जिंकले, काँग्रेस जिंकणार? तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आणि 80 वर्षांचे मल्लिकार्जुन खर्गे प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेत. देशभरातील 9900 काँग्रेस डेलिगेट्सना मतदानाचा हक्क होता. त्यापैकी साडेनऊ हजार जणांनी मतदान केलं आणि खर्गेंना 7897 मतं मिळाली तर थरुर यांना 1072 मतं मिळाली. खर्गेंचं काँग्रेसमधल्या झाडून सगळ्या नेत्यांनी अभिनंदन केलं. खर्गेंविरोधात लढणारे शशी थरुर तर त्यांना घरी जाऊन भेटले. निवडणुकीवरुन खर्गे आणि थरुर कँपमध्ये जोरदार घमासान झालं.. पण आता अध्यक्षपदी खर्गे निवडून आल्यानंतर सगळ्यात मुख्य प्रश्न आहे की खर्गेंसमोरची आव्हान कुठली? आणि त्या आव्हानांचा डोंगर खर्गे कसा पेलणार?

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola