Nitesh Kumar Bihar : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारची आज बहुमत चाचणी , राजकीय वातावरण तापलं : ABP Majha

Continues below advertisement

बिहारमध्ये आज नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा असून, वर्षभरातच राजद सोबतचा संसार मोडत पुन्हा भाजपसोबत जात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. त्यामुळे जेडीयू-भाजप सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण तापलं असून, प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांची एकजूट ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजदमध्ये वेगवान घडामोडी घडत असून तेजस्वी यादव यांनी आमदार फुटू नयेत यासाठी त्यांच्या निवासस्थानीच त्यांना थांबण्यास सांगितले आहे. तर बोधगयातील दोन हॉटेल्समध्ये भाजपा आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्यांना हॉटेलबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेलच्या कॅम्पसमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यास बंदी आहे. तर काँग्रेसने सर्व आमदारांना हैदराबाद येथे थांबवून ठेवले होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram