Devendra Fadnavis Majha Vision : देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन काय? माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन
abp majha web team
Updated at:
24 Jan 2023 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Maharashtra Majha Vision 2023 : ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केला. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन मांडलं. "गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत."