Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 02 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदीपात्रात ११ हजार ४०७ क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु.
आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता, नागपुरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा.
गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रविंद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघात चाचपणी, ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्यांमध्येच रस्सीखेच, तान्हाजी मुटकुळे आमदार असलेल्या हिंगोली मतदारसंघातून रामदास पाटील सुमठाणकर ही निवडणूक लढण्यास इच्छूक, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार.
कल्याणमधील भाजप बुथप्रमुखाच्या मोबाईल शॉपवर गोळीबार, अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात जयेश भोईर आणि पद्माकर मल्ला थोडक्यात बाचावले.
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी, क्रिमी लेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय.
लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती, जमाती बाबतच्या कोर्टाच्या निर्यणाचं स्वागत, समाजातील छोट्या-छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया.