Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका

Continues below advertisement

अकलूज नगरपालिकेसाठी मोहिते पाटील यांच्या पॅनलची सांगता सभा रात्री पार पडली. या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख यांनी तुफानी टोलेबाजी करीत अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खिल्ली उडवली. 

 अजित पवार हे आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असल्याचे सांगतात मात्र त्यांची अवस्था गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा या चित्रपटाप्रमाणे झाली असल्याची खिल्ली शेळके यांनी उडवली. अजित दादा यांचा पक्ष हा भाजपची बी टीम असून केवळ सेक्युलर मध्ये खाण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरतात असा टोलाही लगावला. हेच अजितदादा दिल्लीत गेल्यावर मोदी यांच्यासमोर हम साथ साथ है म्हणतात .. मुंबईतही फडणवीसन समोर हम साथ साथ है म्हणतात आणि इकडे नगरपालिका प्रचाराला आल्यावर भाजपला हम आपके है कौन असे विचारतात .. अशा शब्दात महेबुब शेख यांनी अजितदादांवर टार्गेट केलं. 


पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना यांचे फक्त नाव गोरे आणि काम सगळे काळे असल्याचे शेख यांनी सांगितले. मोहिते पाटील हे अकलूज साठी आई असून जयकुमार गोरे राम सातपुते रणजीत निंबाळकर हे सर्व फडणवीसांची दाई आहेत असा टोला लगावला .. फडणवीस आणि यांचा पगार बंद केला की आहे ही घरे विकून हे निघून जाऊ शकतात असे सांगत मोहिते पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन मेहबूब शेख यांनी केले. अकलूज नगरपालिकेत सर्व 26 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावाही शेख यांनी केला. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यात जो विकास झाला नाही तो इथे झालेला असल्याचे सांगताना विकास झाला नाही म्हणणार यांचे डोळे आणि मेंदू तपासावा लागेल असा टोला लगावला.

अकलूज मध्ये दहशत असती तर येथे तीन पॅनल उभारले नसते असे सांगितले. खरी दहशत भाजप मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईमध्ये दाखवताना पोलिसांच्या मदतीने सर्व विरोधकांचे अर्ज काढून आपल्या आईला बिनविरोध निवडून आणले त्याला दहशत म्हणतात .. गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नीला बिनविरोध निवडून आणले त्याला दहशत म्हणतात असा टोला पालकमंत्री गोरे यांना शेख यांनी लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola