Maharashtra Government Formation | महाविकासआघाडी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार : सूत्र | ABP Majha
महाविकासआघाडी आजच सत्तास्थापनेचा दावा करु शकते, अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. दिल्लीत काल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये खातेवाटपाववर आणि किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची प्रतिक्रिया आघाडीतल्य़ा नेत्यांनी दिली. त्यानंतर आज दुपारी ३ वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची बैठक होईल. आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर संध्याकाळी महाविकासआघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.