Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी

Continues below advertisement

Mahayuti clash: राज्यातील सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड अंतर्गत तणाव आणि बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. रविवारी दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही पक्षांमधील अंतर्गत हेवेदावे किती टोकाला पोहोचले आहेत, याचे प्रत्यंतर आले. दिल्लीत हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांची बैठकी पार पडते. या बैठकीला अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. परंतु, या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीतील या बैठकीला दांडी मारली आहे. एरवी सर्वपक्षीय बैठकीला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Ajit Pawar) प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हजर राहतात. मात्र, आज राष्ट्रवादीचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहिलेला नाही. तर दुसरीकडे लोकसभेतील शिवसेनेचे (Shivsena) गटनेते श्रीकांत शिंदे सर्वपक्षीय बैठकीला हजर राहतात. मात्र, आज या बैठकीला श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी नरेश म्हस्के हजर राहिले होते. या सगळ्यामागे महाराष्ट्रात महायुतीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत तणाव कारणीभूत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics)

राज्यात येत्या मंगळवारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. यापूर्वी सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष  नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढवत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर सध्या तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष रंगला आहे. स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष एकमेकांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावून कुरघोडी करत आहे. तसेच राज्यात कोणाचे वर्चस्व आहे, राज्याच्या तिजोरीवर कोणाचे वर्चस्व आहे, यावरुन तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola