Nitin Gadkari यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथाविरोधात गुन्हा नोंदवण्याची शक्यता
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथा उर्फ शाकीर विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदवला जाण्याची दाट शक्यता आहे... तपासात समोर आलेल्या माहितीनंतर नागपूर पोलीस जयेश कांथा विरोधात यूपीए अन्वये दुसरा गुन्हा नोंदवण्याच्या विचारात आहे... जयेश कांथा उर्फ शाकीरने बेळगावच्या तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 14 जानेवारी आणि 21 मार्च असे दोन वेळेला धमकीचे कॉल केले होते...
Continues below advertisement