SC Hearing on Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा नीरज कौल यांना सवाल
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा तिसरा आठवडा आहे...आणि आज तिसऱ्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला... राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितलं.. आणि तरीही ठाकरेंनी राजीनामा दिल्याचं शिवसेनेचे वकील नीरज कौल यांनी म्हंटलंय... शिवाय राज्यपालांची भूमिका कशी योग्य होती हे पटवून देण्याचा प्रयत्न कौल यांनी केला.. यादरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कौल यांना अनेक प्रश्न विचारले.. शिवाय तुम्ही शिवसेना आहात की नाही
हे विधीमंडळात ठरवू शकत नाही असंही ते म्हणाले... अपात्रतेच्या निर्णयापूर्वी बहुमत चाचणी होणं, या निर्णयाने दहाव्या सुचीचं प्रयोजनच संपेल असंही चंद्रचू़ड म्हणाले.. दरम्यान सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली असून उद्या पुन्हा कौल युक्तिवाद करणार आहेत... हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकाल लावण्याचे संकेत कोर्टानं दिलेत..