Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण
नागपुरातील 'गोपाळ चहावाला' फडणवीसांच्या शपथविधीला जाणार, 5 डिसेंबरच्या शपथविधीसाठी गोपाळ चहावाल्याला निमंत्रण, गोपाळ हे बावनकुळे, देवेंद्र फडणवीसांचे मोठे फॅन.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे. तसेच 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.