Chhagan Bhujbal on Marathi Language : 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार?' : छगन भुजबळ
Continues below advertisement
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा या विषयावर विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत असून, आवश्यक ते सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधलं. त्यावर उत्तर देताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सभागृहातील सर्वच सदस्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement