Gopichand Padalkar Rada : कार्यकर्त्यांवरील कारवाईला समोरं जाऊ, कोर्टात बाजू मांडणार
गोपीचंद पडळकर यांनी काल माननीय अध्यक्षांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या सहकाऱ्यांकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले आणि अध्यक्षांना कारवाई करण्याची विनंती केली. रात्री उशिरा त्यांच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला. यावर बोलताना, “कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. दाखल झालेल्या गुन्ह्याला न्यायालयात सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन देशमुख यांच्यावरील हल्ल्याच्या व्हिडिओबाबत त्यांनी तो कार्यकर्ता ओळखीचा नसल्याचे म्हटले. तसेच, पोलिसांच्या गाडीची मोडतोड आणि पत्रकाराला मारहाण यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांची लक्षवेधी चर्चा मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे झाली नाही, असेही त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर कोर्टात बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.