Madandas Devi Passed Away : संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवींवर अत्यंसंस्कार : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल बंगळुरूत निधन झालं.. त्यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज
पुण्यात आहेत. काल रात्री उशिरा ते पुण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही देवी हे अंत्यदर्शन घेणार आहेत. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे  सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेणारेत.  देवी यांचं पार्थिव आज सकाळी ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबागमधील कार्यालयात ठेवण्यात आलंय. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram