Lok Sabha Live Update : अधिकारी बदल्यांच्या विधेयकावरून संसदेत आज गदारोळाची शक्यता : ABP Majha

Continues below advertisement

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातलं दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकला आम आदमी पार्टीचा विरोध असून या विधेयकाला सर्वांनी विरोध करण्याचं आवाहन आपचे अरविंद केजरीवाल यांनी केलंय. या विधेयकाला विरोध करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्व विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची एकूण वेळ आणि दिवस ठरवला जाऊ शकतो. याच मुद्द्यावरुनही लोकसभेत गदारोळाला तोंड फुटू शकतं. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरुनही संसदेत आज पुन्हा विरोधक सरकारला घेरु शकतात.त्यामुळे संसदेचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram