Lok Sabha Election Phase 2 : राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान
Continues below advertisement
आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १२ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे. राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत. त्याशिवाय मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
Continues below advertisement