Kishor Aware: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी आवारेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
पुण्याच्या तळेगावमधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलंय... राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी आवारेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केलाय... त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडालीये... याबाबत आमदार शेळके यांना संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला... मात्र त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे...