Karuna sharma यांचं Dhananjay Munde यांना खुल आव्हान, माझ्या उमेदवारांना हरवून दाखवा : शर्मा

देवेंद्र फडणवीस यांनी करुणा दाखवली म्हणून वाचलात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धनंजय मुंडे यांना लगावला आणि काही वेळातच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना खुलं आव्हान दिलं. बीड जिल्हा परिषदेत ६० उमेदवार उभे करण्याची घोषणा करत, हिंमत असेल तर त्यांना पराभूत करा, असं आव्हान करुणा शर्मा यांनी मुंडे यांना दिलंय. काल विधानसभेतील मुंडे-शिंदे जुगलबंदीनंतर काही वेळातच करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या या भेटीनंतर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेत खुलं आव्हान दिलं..... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola