Karnataka By-Poll Results | कर्नाटक पोटनिवडणुकीत 10 जागांवर भाजपची आघाडी | ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकात विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झालीय. 10 जागांवर भाजपला आघाडी मिळालीय. तर एका जागेवर जेडीएस आणि दोन जागांवर काँग्रेस पुढे आहे. येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी यापैकी किमान सहा जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. १७ आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडलं होतं. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. सत्ताधारी भाजपसाठी या पोटनिवडणुकीतील सहा जिंकणं गरजेचं आहे. तरच येडियुरप्पा सरकार टिकणार आहे.
Continues below advertisement