JP Nadda on RSS : जे.पी. नड्डा यांचं आरआरएसबाबत मोठं वक्तव्य! दरेकर काय म्हणाले?

Continues below advertisement

JP Nadda Statement on BJP and RSS: नवी दिल्ली : आता आम्ही सक्षम, भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो, असं भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले आहेत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जेपी नड्डा (JP Nadda) यांनी हे वक्तव्य केलं आहे. वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना जेपी नड्डा यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, आधी असक्षम होतो, म्हणून संघाची गरज पडत होती, असंही जेपी नड्डा म्हणाले आहेत. यासोबतच मथुरा, काशीतल्या मंदिर बांधणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नव्या मंदिरनिर्माणाचा ना विचार, ना कल्पना, ना इच्छा, असंही जेपी नड्डा म्हणाले आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बोलताना म्हणाले की, "शुरु मे हम अक्षम होंगे, थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये है, सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है, असं वक्तव्य जेपी नड्डा यांनी केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय? असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जेपी नड्डा यावेळी विसरले नाहीत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram