Jitendra Awhad On Rahul Narvekar : गीता गवळीला महापौर करणार, आव्हाडांनी जोडले हात ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली असून महायुतीला (Mahayuti) ४५ पेक्षा जास्त जागांवर विजयी करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, जागावाटपावरुन अद्यापही महायुतीत एकमत नसल्याचे दिसून येते. कारण, ठाणे, कल्यासह मुंबईतील काही जागांवर अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे, या जागांवरील उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या उमेदवारीचीही चर्चा जोर धरत असून दक्षिण मुंबईतील मतदारसंघात त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दगडी चाळीतला डॅडी आणि डॉन अरुण गवळींच्या (Arun Gavali) दगडी चाळीशी नातं जोडण्याचा प्रयत्न राहुल नार्वेकरांनी केला आहे. प्रचारादरम्यान, एका भाषणात त्यांनी अरुण गवळींची स्तुती करताना गीता गवळींना मुंबईचा महापौर बनविण्याचा निर्धार केला आहे.