Jitendra Awhad on Mahesh Ahir : ठाण्याच्या सभेत आव्हाडांकडून महेश अहिर यांच्यावरही आरोप

Jitendra Awhad on Mahesh Ahir : ठाण्याच्या सभेत आव्हाडांकडून महेश अहिर यांच्यावरही आरोप

ठाण्यात आनंद दिघेंच्या शक्ती स्थळावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय.  ठाण्यात निवडणूक लढवून आणि जिंकूनही दाखवणार, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलंय.ठाण्यातील ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने जनप्रक्षोभ मोर्चा काढला. या मोर्चातून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोशनी शिंदे यांच्यावर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. आणि त्यून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, या मागणीसाठी ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण सहभागी तसेच ठाकरे गटाचे विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुषमा अंधारे यांचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळाजवळ जाऊन थांबला. दिघेंच्या शक्तिस्थळावर नतमस्तक होत आदित्य ठाकरेंनी सरकारमधल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याची शपथ घेतली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola