फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासंदर्भात हायकोर्टाकडून हसन मुश्रीफांना हायकोर्टानं मोठा दिलासा मिळालाय. याप्रकरणातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास हायकोर्टानं पोलिसांना मनाई केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी कोणताही संबंध नसताना बेछूट आरोप करणा-या किरीट समोय्यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.