Jalna : दानवेंविरोधात नाभिक समाज आक्रमक; रावसाहेब दानवेंनी माफी मागितली नाही तर....
जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काल नाभिक समाजाने आंदोलन केलं.. नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं.. यावेळी काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला.. रावसाहेब दानवेंची अर्धी कटिंग करणाऱ्याला २१ हजारांचं बक्षीस देण्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.. तसंच दानवेंनी माफी मागितली नाही तर भाजपला नाभिक समाज मतदान करणार नाही असा ठराव घेण्यात येईल असा इशाराही देखील यावेळी देण्यात आला.