Irrigation scam | विदर्भ पाटबंधारे विकासच्या 9 फाईल बंद | ABP Majha

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत सुरु असलेलेल्या 9 प्रकरणांची चौकशी गृहमंत्रालयानं बंद केली आहे... तसं एक पत्र माझाच्या हाती लागलं आहे... आणि या मागे अजित पवारांना दिलासा देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.पण एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार यातल्या कोणत्याही प्रकरणांचा अजित पवार यांच्याशी संबंध नसल्याचं कळतंय. येत्या 28 तारखेपर्यंत लाचलुचपत खात्याला या प्रकरणातल्या तपासातल्या प्रगतीबाबत अहवाल सादर करायचा होता... पण त्याआधीच या 9 प्रकरणातल्य़ा फाईल पुराव्यांभावी बंद करण्यात आल्या...
पण भाजपने सत्तेत येताच त्याचा फायदा अजित पवारांना करुन दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola