ABP News

India Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP Majha

Continues below advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केलेल्या नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.   उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS)  संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार,  असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत.  

उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल.  पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100  =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram