India Alliance BKC Rally : मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सांगता सभा ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. अशातच 20 मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईचाही (Mumbai News) समावेश आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये (Mumbai Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया (Voting) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडणार आहे.
मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.