Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण
Continues below advertisement
आता बातमी आहे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासंदर्भातली.. समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे. सकाळी ११ वाजता होणार लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. भरवीर ते इगतपुरी अशा २५ किलोमिटरचा हा तिसरा टप्पा आहे. तसंच एकूण 16 गावातून जाणारा हा रस्ता 25 किमी लांबीचा आहे. या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 किमी पैकी आता एकूण 625 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी,दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर आणि आज सुरु होणारा तिसरा टप्पा भरवीर ते इगतपूरी असा असणार आहे. तर सर्वात शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे असा असणार आहे.
Continues below advertisement