AJit Pawar | मी राष्ट्रवादीतच आणि शरद पवारच आपले नेते - अजित पवार | ABP Majha
Continues below advertisement
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता अजित पवार पुन्हा 30 तासानंतर सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह' झाले असून त्यांनी अभिनंदनाचे ट्वीट स्वीकारले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. अजित पवारांच्या बंडोखोरीमुळं पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी पक्षात परतावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एका बाजूला प्रयत्न करत असताना अजित पवारांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन असा ट्वीट करत राजकरणात एक नवा ट्विस्ट आणला आहे. तर अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहे हे मला माहित नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या ट्वीटवर प्रतिक्रया दिली आहे.
Continues below advertisement