Nawab Malik's Arrest : नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यभरात पडसाद, शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
Nawab Malik's Arrest : Maharshtra : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. आज पुणे जिल्ह्यातील बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजप विरुद्ध घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.