Hindu Jan Akrosh Morcha : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू आक्रोश मोर्चा
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHindu Jan Akrosh Morcha : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला (Hindu Jan Aakrosh Morcha) सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) इथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झाल्या आहेत.