Hindu Garv Garjana Special Report : CM Eknath Shinde हिंदुत्वाचा झेंडा घेऊन करणा राज्यव्यापी दौरा

Continues below advertisement

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि राज्यात आपला जनाधार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्याचा दौरा करणार आहेत. हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन मुख्यमंत्री राज्याचा हा दौरा करणार आहे. हिंदू गर्व गर्जना असं एकनाथ शिंदे यांच्या या मोहिमेचं नाव आहे. त्यामुळं शिंदे यांचा हा दौरा हिंदू गर्व गर्जना यात्रा म्हणून ओळखला जाईल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आपली हिंदुत्वाची भूमिका रुजवण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी आज 1000 रुद्राक्षांच्या माळा भेट दिल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उजव्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असायच्या. त्याच पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचं आक्रमक हिंदुत्व अधोरेखित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना रुद्राक्षांच्या माळा भेट देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram