Hemant Godse Nashik : छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय आहेत - हेमंत गोडसे

Continues below advertisement

Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये लोकसभेसाठी इच्छुक होते. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगल्या आहेत. परंतु छगन भुजबळ हे नाराज नसून ते प्रचारात सक्रिय आहेत, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली.

महायुतीत शिवसेना शिंदे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाली असे दिसत होते. मात्र आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे मला समजले, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram