Hasan Mushrif on NEET Exam : नीटच्या परीक्षेत गैरव्यवहाराचा प्रकार, ही परीक्षा रद्द झाली पाहिजे
Hasan Mushrif on NEET Exam : नीटच्या परीक्षेत गैरव्यवहाराचा प्रकार, ही परीक्षा रद्द झाली पाहिजे अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
हे देखील वाचा
बारामती-बीडच्या जागा कशा पडल्या, महाराष्ट्रातील जागा का घटल्या; प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील घरी अजित पवार-फडणवीसांची खलबतं
लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या (Mahayuti) जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 43 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीला यंदा केवळ 17 जागांवरच विजय मिळाला आहे. त्यापैकी, भापला 9 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात तणावाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आमच्या मित्र पक्षातील समन्वयावर एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले होते. त्यानंतर, आता राजधानी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक होत असून बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याची माहिती आहे.