Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार

Continues below advertisement

चंढीगड : हरिणाया विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं स्पष्ट झालं असून जवळपास 49 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला. तर काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानाव हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय. 

निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपनं मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे. हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. आत्तापर्यंत संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल, मात्र 12 तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 

वास्तविक, गेली 10 वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती. अशा स्थितीत अँटी इन्कम्बन्सीसह अनेक बाबी समोर आल्याने भाजपचे नुकसान होताना दिसत होते. पण भाजपने हरियाणा निवडणुकीच्या 7 महिने आधी अशी खेळी केली, ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram