H K Patil Mumbai Daura : महाराष्ट्र काँग्रेसमधील कलह, काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार

Continues below advertisement

H K Patil Mumbai Daura : महाराष्ट्र काँग्रेसमधील कलह, काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार

काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह, नाशिक पदवीधर मतदारसंघातलं सत्यजीत तांबे प्रकरण, काँग्रेसमधील गटबाजी आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या विधीमंडळ गटनेतेपदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे रविवारी मुंबईत येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या पेचप्रसंगानंतर एच. के. पाटील पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. थोरात आपल्या राजीनाम्यावर ठाम असून, त्यांची समजूत काढण्यासाठी एच. के. पाटील मुंबईत येणार आहे. ते १३ फेब्रुवारीला थोरातांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्याआधी, एच के पाटील यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram