Gram Panchayat Election अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयुक्तांची माहिती ABP Majha
Gram Panchayat Election अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयुक्तांची माहिती ABP Majha
राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायती च्या रणधुमाळीला सुरुवात झालीय..याच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 28 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली.. अर्ज भरण्यासाठी काही तासाचा अवधी शिल्लक राहिला असतानाच बीडमध्ये मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची साईट हँग होत असल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागतेय. ग्रामपंचयातीच्या निवडणूका जाहीर होताच गावपुढारी होण्यासाठी गावागावात मोठी चुरस निर्माण झाली आहे..28 तारखेपासून याच निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली खरी मात्र अर्ज भरण्यासाठीची साईट दिवसा चालत नसल्याने भावी सरपंचांना प्रचार सोडून इंटरनेट कॅफे मध्ये रात्र जागून काढावी लागत आहे. त्यानंतर आता अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आली असून, निवडणूक आयुक्तांची माहिती दिली आहे.