Govt employee strike call off : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारसोबतची चर्चा सकारात्मक
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप अखेर ७ दिवासांनी मागे घेतलाय.. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलंय.. सरकारने कर्मचारी संघटनांना लेखी आश्वासन दिलंय.. त्यामुळे सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा संप आज संपुष्टात आलाय..सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.. आज मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केलीय..