Sanjay Raut | भाजपला सत्ता स्थापनेसाठी 72 तास, शिवसेनेला फक्त 24 तास? राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पावलं, संजय राऊतांचा आक्षेप | ABP Majha
Continues below advertisement
भाजप सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोछा पक्ष म्हणून शिवसेनेला संधी दिली आहे. आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याचा अवधी दिला गेला आहे, मात्र कमी वेळ मिळाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तास दिले गेले होते परंतु शिवसेनेला फक्त 24 तासांचा अवधी मिळाला हा राऊतांचा आक्षेप होता.
बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देणं अपेक्षित होतं अनेक लोकांना एकत्र करुन सरकार स्थापन करणयात वेळ लागतो ही खंत त्यांनी व्यक्त केली. पण राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने 'ढकलायचंच' या 'चं' वर जोर देऊन ज्यांनी काम केलं त्यानुसार ही पावलं पडत आहेत, असा जोरदार आरोप संजय राऊत यांनी केला.