Maharashtra Ministers portfolios | मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, अधिकृत खातेवाटप जाहीर
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे अधिकृत खातेवाटप जाहीर झालं आहे. खातेवाटपाची यादी काल रात्री 7.30 वाजता राज्यपालांकडे सुपूर्द केल्याचं जयंत पाटलांनी ट्विटवरुन स्पष्ट केलं होतं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. राज्यपालांची सही होऊन मंजूर झालेली मंत्रिमंडळ यादी माझाच्या हाती आली आहे.
Continues below advertisement