Gajanan Kale On Raj Thackeray : भाजलेली सुपारी म्हणत गजानन काळेंची अनिल परबांवर टीका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 May 2024 07:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं येत्या १७ मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. शिवतीर्थावर सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवर खेळवणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे? असे खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारले आहेत. आणि अनिल परबांच्या या टीकेला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.