ABP News

Fadnavis Meets Anna Hazare | राळेगणसिद्धीत फडणवीसांकडून अण्णा हजारेंची भेट, आंदोलनापूर्वी मनधरणीचा प्रयत्न

Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेच्या विश्वस्तांसोबत बैठक सुरू झाली आहे. अण्णा हजारे यांनी उद्या म्हणजे 30 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा दिलाय. त्यानंतर केंद्रात हालचालींना वेग आला असून आज केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी अण्णांच्या भेटीला राळेगणसिद्धी येथे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केलीये. उद्याच्या आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरणार असून आता केंद्रीय मंत्र्यांसोबत काय चर्चा करायची तसेच आपल्या मागण्या कशा प्रकारे मांडायच्या याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर अण्णा हजारे यांची केंद्रीय कृषी मंत्रालय सोबत चर्चा होणार आहे त्यामुळे आता बैठकीत नेमके काय निर्णय होतात हे पाहावे लागणार आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram