Sengol Controversy : राजमुद्रेऐवजी सेंगोल, वादाचा बोल; विरोधकांचा वार Special Report
आणिबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महायुती सरकारने दिलेल्या जाहिरातीत अशोकस्तंभाऐवजी सेंगोलचा वापर केल्याने वाद निर्माण झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही कृती संविधानविरोधी असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आणिबाणीबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले. सेंगोल हा राजदंड असून अशोकस्तंभ ही राजमुद्रा असल्याचे स्पष्ट केले गेले.