Corona And Elections : सर्व पक्षांना निवडणुका हव्यात! पाच राज्यांमध्ये निवडणुका होणारच!

Continues below advertisement

UP Assembly Elections Election Commission Press Conference:   उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता मात्र मावळली आहे. कारण सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका वेळेतच घेतल्या जाव्या असं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. निवडणूक आयोगानं लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली.  यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, राजकीय पक्षांना वेळेवर निवडणुका हव्या आहेत. काही राजकीय पक्ष प्रचारसभा, रॅलींच्या विरोधात आहेत. ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढं ढकलण्याला पक्षांचा विरोध आहे. निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ एक तास वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. मतदान सकाळी 8 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.  

आयोगानं म्हटलं आहे की, राजकीय पक्ष जास्त गर्दी असलेल्या परिसरात बूथ बनवण्याच्या विरोधात आहेत. रॅलींमध्ये कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्यानं आम्ही देखील चिंतेत आहोत. राजकीय पक्षांसोबत आम्ही महिलांच्या सुरक्षेविषयी देखील चर्चा केली. 

निवडणूक आयोगानं सांगितलं की, यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतदानात 52 टक्के नवीन मतदार आहेत. याची अंतिम यादी 5 जानेवारी रोजी येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, सर्व मतदान केंद्रांवर VVPAT मशीन लावण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जवळपास 1 लाख मतदान केंद्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram